अवलियांचा कुंभमेळा
समीर अधिकारी
०८ ऑगस्ट २०२०
कुंभमेळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो डोक्यावर जटा वाढवलेल्या, अंगाला राख फासलेला, उग्र, हातात त्रिशूळ वगैरे घेतलेल्या, चित्रविचित्र हावभाव करणाऱ्या, गंगेत स्नानासाठी धावणाऱ्या नग्न साधूंचा समूह. पण दरवर्षी एक असाही कुंभमेळा भरतो, जिथे वरवर सर्वसामान्यांसारखेच दिसणारे पण रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं करणारे अवलिये ज्ञानगंगेत डुंबण्यासाठी धाव घेतात! कल्पना करा की, जगभरातून जमलेल्या साताठशे लोकां…